बंद

    दृष्टी, ध्येय आणि धोरण

    दृष्टी आणि ध्येय

    • रेशीम शेतीला लोकप्रिय करून रेशीम उद्योगातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करून लोकांचा खेडयाकडुन शहराकडे जाणारा लोंढा थांबवुन स्थानिक पातळीवर त्यांना स्वयंपुर्ण करणे.

    • शाश्वत रेशीम शेतीसाठी खाजगी सहभागाव्दारे रेशीम शेतीला स्थैर्य मिळवुन देणे.
    • राज्यात मोठया प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढविणे.
    • दुबार जातीच्या रेशीम कोष उत्पादनाला चालना देणे.
    • रेशीम शेतीला चालना देउन महाराष्ट्र राज्यास अपारंपारिक रेशीम उद्योगाकडुन पारंपारीक राज्याचा दर्जा प्राप्त होणेसाठी प्रयत्न करणे.
    • सहकारी क्षेत्रामध्ये विशेषत: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुती कोष खरेदी विक्री बाजारपेठा स्थापीत करणे तसेच शासनाचे सोलापूर ,जालना,बारामती, बीड, परभणी येथे कोष खरेदी बाजारपेठ उभी करणे.

    • टसर कोष खरेदी विक्री बाजारपेठा स्थापीत करणे.
    • तुती व टसर कोषोत्तर (पोस्ट कोकून ॲक्टिव्हिटी) प्रक्रियांमध्ये खाजगी उद्योजकांचा सहभाग वाढविणे.
    • तुती व टसर रेशीममध्ये राज्यातील कोष राज्यातच प्रक्रिया करून (माती ते कापड) सर्वंकष उद्याोगाची उभारणी करून त्याव्दारे रोजगार निर्मिती करणे.
    • तुती व टसरमध्ये संशोधन करून उत्पादन व उत्पादकता वाढविणे.
    • राज्यामध्ये विभागनिहाय प्रादेशिक स्तरावर संशोधन व प्रशिक्षण केंद्रे उभारणे.
    • रेशीम शेतीचा समांतर व चढत्या क्रमाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधणे.
    • राज्यात तुती लागवड क्षेत्र मोठया प्रमाणात वाढविणे.
    • रेशीम शेती उद्योगाला मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी देणे.
    • उच्च प्रतीचे कोष उत्पादन व रेशीम व रेशीम सूत निर्मिती करून रोजगार निर्माण करणे.
    • उच्च प्रतीचे कच्चे रेशीम सूत मोठया प्रमाणात उत्पादन करणे.
    • निमशासकीय संस्थेव्दारे दुबार जातीच्या रेशीम उत्पादनास प्रोत्साहन देणे.

    धोरण

    • रेशीम शेती उद्योगाला मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी देणे.
    • अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीम शेतीचा समांतर व चढत्या क्रमाने विकास साधणे.
    • उच्च प्रतीचे कोष उत्पादन व रेशीम सूत निर्मितीपुढील साखळी वृद्धींगत करणे.
    • 100% रोपांव्दारे उच्च प्रतीचे तुती वाणांची लागवड करणे.
    • अंडीपुंज पुरवठा न करता 100% टक्के प्रशिक्षीत परवानाधारक चॉकीधारकांकडुन चॉकी अळया शेतक-यांना पुरवठा करणे.