Select Theme
Default Theme Black Theme   Blue Theme Orange Theme Brown Theme

 

Silk Cocoons

रेशीम कोष रेषीम किटकंच्या जीवन चक्रातील 5 व्या अवस्थेनंतर लाळेद्वारे सिल्कचा स्त्राव सोडून किटक स्वतः भोवती 48 ते 72 तासात सुरक्षा कवच बनवतो. त्यालाच रेषीम कोष म्हणतात. महाराश्ट्रामध्ये प्रामुख्याने संकरित व दुबार जातीचे कोष उत्पादन घेतले जाते. सुणर्वआंध्र, कोलार गोल्ड या बहुवार सी. बी. जातीचे व सी. एस. आर. आणि सी. एस. आर. हायब्रीड हे दुबार जातीचे संगोपन केले जाते. संचालनालयामार्फत आधारभूत दराने प्रतवारीनुसार कोष खरेदी केले जातात. प्रचलित कोष उत्पादन वाढीसाठी केंद्र व राज्यषासनाच्या आर्थिक सहाय्याने किटक संगोपनासाठी लागणाऱ्या निंर्जुतुकिकरण औशधाचा पुरवठा केला जातो. एका कोषाचे वनज 1.5 ते 2 ग्रॅम पर्यंत असते. त्यापासून 1000 ते 1200 मीटर पर्यंत सलग धाग्याची निर्मिती होते. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेले कोष खरेदीसाठी शासना व्यतिरिक्त खाजगी व्यापारी रिलर्स घटकांमार्फत खरेदी करण्यासाठी बाजारपेठ निर्मिती केलेली आहे. राज्याबाहेर ही शेतकरी कोष विक्रीकरू शकतो.

रेशीम अळीचे अंडिपुंजातून बाहेर आल्यानंतर पाच अवस्थेपासून संक्रमण करून साधारणतः 26 ते 27 दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी होऊन अळीची कोशी कमी होते. व तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरूवात करते. अशा अळया कोष निर्मिती करीता प्लास्टीक /बांबु चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेषीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते व कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसात पूर्ण होते. या अवस्थेत रूममधील तपमान 24 डि. ग्री. से. , आर्द्रता 60 ते 65 टक्के व खेळती हवा असणे गरजेचे असते. कोषावर आलेली अळी जवळपास 1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टीक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होऊ षकतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 1.8 मी. असते. कोषातील रेषीमाचे प'माणे साधारणतः 18-20 टक्के असते. चंद्रिकेवर कोषावर आलेली अळी सोडल्यास 4 ते 5 दिवसात कोष तयार होतात. एका कोषाचे वनज साधारणतः 1.5 ते 1.8 ग्रॅम असते. चंद्रिकेवरून 5 व्या दिवषी कोष काढले जातात. सदरचे कोष विक्री करता पातळ पोत्यामधून व थंड वातारणामध्ये वाहतुक केली जातात सदर पूर्ण झालेला कोष हा बायहोल्टाईन जातीचा (पांढरा) आहे. या बायहोल्टाईन पांढऱ्या कोशापासून उत्पादीत केलेल्या सुतास जागतिक मागणी आहे. एका किलो ग्रॅम मध्ये 600 ते 1000 कोष बसतात. प्रति किलो ग्रॅम रेषीम कोषास रू. 90 ते 150/- पर्यंत ग्रेडनिहाय दर संचालयामार्फत प्रचलित आहेत. ष कोषा

  • Digital India, Government of India
  • Aadhar Card Portal
  • Government of India
  • Aaple Sarkar, Government of Maharashtra, India
  • Digital Locker Portal, Government of India