उद्दीष्टे
- शेतकरी कोष उत्पादन दुप्पट करणे.
- तुती क्षेत्रात, 100% बायव्होल्टाइन कोष उत्पादन तयार होणे.
- तुती क्षेत्रात, 100% चॉकी शेतकऱयाांना उपलब्ध करून देणे, पररणामी कोषाांची गुणवत्ता आरण उत्पादनात वाढ होईल.
- तुती क्षेत्रात, 100 अंडीपुंजपासुन 65 रकलोग्रॅम वरून 70 रकलो पयंत कोष उत्पादनात वाढ होणे.
- कर्नाटक राज्याचे धरतीनुसार जालना आणि सोलापूर कोष बाजारपेठेचे व्यवस्थापन करणे आणि. राज्यातील इतर भागातही नवीन कोष बाजारपेठेची स्थापना करणे.
- गडचिरोली,चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया याांसारख्या महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्ह्यांशिवाय महाराष्ट्रातील इतर भागाांमध्ये टसर रेशीम शेतीचा विस्तार करणे, असन आणि अर्जुन सारख्या अन्न वनस्पतींच्या उपलब्धतेचे सर्वेक्षण करणे.
- टसर रेशीम लाभारतींची संख्या 1355 वरून 3000 पर्यंत वाढवणे.
- टसरमधील बायव्होल्टाइन कोषांचे उत्पादन 20% वरून 50% पर्यंत वाढवणे.
- टसर रेशीमची उत्पादकता 30 कोष प्रती अंडीपुंज वरून 45 कोष प्रति अंडीपुंज पर्यंत वाढवणे.
- आरमोरी जि.गडचिरोली येथे टसर कोष खरेदी बाजाराची स्थापना करणे.
- तुती आणि टसर क्षेत्रातील खाजगी अंडीपुंज उत्पादनास प्रोत्साहन देणे.
- उत्पादकासाठी कमीत कमी किमतेची व आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तुती आणि टसर क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
- कोषोत्तर प्रक्रीया उपक्रमाांमध्ये खाजगी उद्योजकांचा सहभाग वाढवणे.
- राज्यातच तुती आणि टसर रेशीम उत्पादनावर प्रक्रिया करणे, माती ते फॅब्रिक स्तरावरील उद्योग निर्माण करणे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणे.
- तुती आणि टसरमध्ये सांशोधन करून उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. छत्रपती सांभाजी नगर जिल्ह्यात आरएसआरएस चालु करणेस प्रयत्न करणे.
- राज्यात सांशोधन केंद्रे आणि प्रादेशिक स्तरावर प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे.
- राज्यात विभागनिहाय अंडीपुंज निर्मिती केंद्रे स्थापन करणे.
कार्य
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून अपारंपरिक शेतीकडे वडवून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे.
- ग्राम, तालुका, जिल्हा, व राज्यपातळीवर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणे किंवा त्यामध्ये सहभाग नोंदविणे.
- रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक उन्नती करण्यासाठी शास्त्रोक्त तंत्रज्ञान वेळेत पुरविणे.
- केंद्र व राज्य शासनाचे योजना रेशीम उद्योग वडीसाठी अंबलबजावणी करणे.
- राज्यात उत्पादीत होणारे रेशीम कोशांकरिता विक्री व्यवस्था निर्माण करणे.
- महाराष्ट्र राज्यात आयएआरएम रिलिंग मशिनरी संख्या वाढवुन उत्पादीत शेतकऱ्यांचा कोषांपासून धागा निर्मिती प्रकल्प वाढविणेसाठी प्रयत्न करणे.
- रेशीम साडी / पैठणी प्रकल्पांना योग्य दजाचे पक्के रेशीम सूत पुरवठा करणेच्या उद्देशाने राज्यात धागा निर्मिती ट्विस्टिंग प्रकल्प वाढीसाठी प्रयत्न करणे.
- आदीवासी भागातील टसर कोष निर्मिती करणा-या लाभार्थ्यास चालना देणे व विक्री व्यवस्त्था बळकट करणेकरीता पद्धती कार्यान्वित करणे.
- टसर रेशीम कोष करणेकरीता वन विभागाची समन्वय साधून पर्यावरण पुरक नवीन एैन व अर्जुन झाडांची लागवड करणे.